उपमा आणि साहेब
भगवान शंकर नेहमीप्रमाणे पृथ्वीचा फेरफटका मारायला निघाले आहेत. पार्वती बरोबर आहेच. पृथ्वीचा फेरफटका मारताना हल्ली त्यांना विहिरीत कुऱ्हाड पडली म्हणून डोक्याला हात लावून बसलेला लाकूडतोड्या दिसत नव्हता. याचं कारण कुऱ्हाड बुडण्याएवढं पाणी असणाऱ्या विहीरीच राहिलेल्या नव्हत्या. समजा खरंच एखादा लाकुडतोड्या विहिरीत कुऱ्हाड पडली म्हणून बसलेला दिसला तर अडचण नको म्हणून शंकराने आपल्या बरोबर नॅनो जेसीबी मशीनहि घेऊन ठेवले होते. पृथ्वीचा हवाई फेरफटका मारताना अपेक्षेप्रमाणे त्यांना कुऱ्हाड विहिरीत पडलेला लाकुडतोड्या कुठेच दिसला नाही. मानवाला मदत करण्याचा योग आज आपल्या कुंडलीत नाही असे शंकराला वाटू लागले. तेवढ्यात त्यांचे लक्ष ऊसाच्या शेताशेजारी उभ्या असलेल्या एका माणसाकडे गेले.
शंकराचे विमान हळूहळू खाली
येते. ऊसाच्या शेताच्या बाजूला चिंताक्रांत चेहऱ्याने उभ्या असलेल्या माणसाच्या जवळ
विमान उभे राहते. शंकर, पार्वती खाली उतरतात. साक्षात शंकराला पाहून त्या
माणसाला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही.पण त्याला विश्वास ठेवणे भाग
पडते. भगवान शंकर नेहमीप्रमाणे पृथ्वीचा फेरफटका मारायला निघाले आहेत. पार्वती बरोबर आहेच. पृथ्वीचा फेरफटका मारताना हल्ली त्यांना विहिरीत कुऱ्हाड पडली म्हणून डोक्याला हात लावून बसलेला लाकूडतोड्या दिसत नव्हता. याचं कारण कुऱ्हाड बुडण्याएवढं पाणी असणाऱ्या विहीरीच राहिलेल्या नव्हत्या. समजा खरंच एखादा लाकुडतोड्या विहिरीत कुऱ्हाड पडली म्हणून बसलेला दिसला तर अडचण नको म्हणून शंकराने आपल्या बरोबर नॅनो जेसीबी मशीनहि घेऊन ठेवले होते. पृथ्वीचा हवाई फेरफटका मारताना अपेक्षेप्रमाणे त्यांना कुऱ्हाड विहिरीत पडलेला लाकुडतोड्या कुठेच दिसला नाही. मानवाला मदत करण्याचा योग आज आपल्या कुंडलीत नाही असे शंकराला वाटू लागले. तेवढ्यात त्यांचे लक्ष ऊसाच्या शेताशेजारी उभ्या असलेल्या एका माणसाकडे गेले.
' बोल वत्सा, कसली काळजी पडली आहे तुला ' भगवान शंकर आत्यंतिक प्रेमळ स्वरात विचारतात.
'
देवा अगदी वेळेवर आलास बघ. लाकूडतोड्याला कुऱ्हाड काढून दिल्याची गोष्ट
लहानपणापासून ऐकत आलोय मी. मलाही तशीच मदत कर देवा ' चिंताक्रांत चेहऱ्याचा
माणूस कळवळीने शंकराला सांगतो.
' अगदी मोकळेपणे सांग. तुझ्यासारख्या माणसांसाठी तर आम्ही चोवीस तास
हेल्पलाईन चालू केली आहे. कुठे पडली आहे तुझी कुऱ्हाड ' भगवान शंकर अजून
लाकूडतोद्याच्या गोष्टीतून बाहेर आलेले नसतात.
' माझी कुऱ्हाड पडली नाहीये'
' मग काही हरवलंय का '
' काही नाही हरवलंय.'
' मग काय प्रॉब्लेम आहे तुझा ?'
' माझी जीभ सारखी घसरतीय हो अलीकडे ' त्या माणसाने आप प्रॉब्लेम एकदाचा सांगितला.
' पाउल घसरत हे ऐकून माहित होतं. पण जीभहि घसरते हे पहिल्यादांच ऐकतोय. हा काय प्रकार आहे वत्सा '
'
पाऊल घसरण्यासारखा प्रकार नाहीये हो हा ' शंकराला कसे समजावून सांगावे असा
प्रश्न त्या माणसापुढे पडतो. मग काही विचार करून तो बोलू लागतो.
' या प्रकाराला स्लीप ऑफ टंग असे म्हणतात. यात काय होत, त्या माणसाचा आपल्या तोंडावर ताबाच रहात नाही. '
भगवान
शंकर त्या माणसाला आपादमस्तक न्याहाळतात. सवयीप्रमाणे पार्वती नवऱ्याच्या मनात काय चालले आहे हे ओळखते.
' अहो त्यांचा ' खाण्या ' वर ताबा नाही असं त्यांना म्हणायचं नाही.
त्यांचा त्यांच्या बोलण्यावर ताबा राहिलेला नाही असं त्यांना सांगायचेय '
पार्वती आपल्या पतिराजांना सांगते. हे ऐकून तो माणूस बरोबर आहे अशा अर्थाने
आपली मान हलवतो.
शंकराला या स्लीप ऑफ टंग झालेल्या इसमाबद्दल कुतूहल वाटू लागते. ते
त्याच्या चेहऱ्याकडे निरखून पाहू लागतात. काही क्षणातच त्या इसमाची कुंडली
शंकराच्या मन:चक्षू समोर उभी राहते. सदरहू इसमाचा अलीकडे आपल्या बोलण्यावर
ताबा राहिलेला नाही हे शंकराच्या लक्षात येते. सदर व्यक्ती अलीकडे वारंवार
मध्यावधी निवडणुकीचे भजन म्हणू लागली आहे असेही भगवान शंकराला दिसते. साहेब
म्हणून परिचित असणाऱ्या या व्यक्तीने आपल्या मुंब्रा स्थित जितेंद्र नामक
एका सहकाऱ्याला सुविद्य, सुशीक्षीत अशा उपमा दिल्याने भूतलावर हास्य स्फोट
होऊ लागले आहेत. लोक हसून हसून गडाबडा लोळू लागले आहेत. या हास्यस्फोटाचे
जनतेवर भयंकर परिणाम झालेले आहेत. आपली काम धामे सोडून लोक हसतच बसले आहेत.
एकूणच भूतलावर साहेबांच्या उपमा नामक गृह उद्योगाने अनर्थ माजला आहे. आपण
असे काही आहोत हे जितेंद्र नामक व्यक्तीलाही ठाऊक नव्हते. त्यामुळे त्या
व्यक्तीलाही आपल्याबाबत साहेब नामक व्यक्तीने दिलेल्या उपमेमुळे जबरदस्त
मानसिक धक्का बसला आहे. आपल्यात एवढे दुर्गुण आहेत आणि साहेब नामक
व्यक्तीने आपल्याला हे आधीच न सांगितल्याबद्दल चि. जितेंद्र याला साहेब
नामक इसमाचा भयंकर राग आला आहे. आता साहेब या व्यक्तीला आपण काय बोलून गेलो
हे कळले आहे. उपमा देण्याची ही सवय अशीच राहिली तर आपण छगन नामक इसमाला
'दारिद्र्य रेषेखालील माणूस ' अशी उपाधी देऊ अशी भीती साहेबांना वाटू लागली
आहे … साहेब नामक इसमाची कुंडली मन:चक्षुपुढे दिसल्यावर शंकराला त्या
माणसाच्या प्रॉब्लेम वर काय औषध द्यावे हे
लक्षात येत नाही.
' वत्सा, तू विहिरीत काय समुद्रात
सापडलेली कुऱ्हाड काढून देईन. मात्र ही तुझी घसरलेली जीभ शोधणे महाअवघड
आहे. ' असं म्हणत भगवान शंकर पार्वतीसह आपल्या विमानातून निघून जातात.
चंद्रहास मिरासदार